Tuesday, September 30, 2014

बारा मोटेची विहीर - शिवउत्तरकालीन स्तापत्यकलेचा अविष्कार ( Bara Mota Chi Vihir )

     साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा रस्त्यावर डावीकडे "लिंब"  गाव आहे.

       या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी 'बारा मोटेची विहीर' आहे.



शिवकालात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक उंची गाठली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर या ठिकठिकाणी अन्य प्रकारची दर्जेदार बांधकामे झाली होती. त्यातीलच एक उत्तम नमुन म्हणजे लिंब (जि. सातारा) येथील बारा मोटेची विहीर. ज्यांना ऐतिहासिक बांधकामे पाहण्याचा आणि त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे त्यांनी तर ही विहीर पाहिलीच पाहिजे...



Bara Mota Chi Vihir - Top View (Sept 2014) - Rahul Bulbule

  •  इतिहास


ही विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज(पाहिले शाहु महाराज) यांच्या  काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या दरम्यान  विरुबाई  यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे 300 झाडाच्या 'अमराई' च्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली.




Bara Mota Chi Vihir - Mahaal (Sept 2014) - Rohit Pawar


  • स्तापत्य : (Architecture)

शिवकालीन स्थापत्यशास्त्र, ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि भव्य कमान आहे, मध्यभागी महाल असून दोन बाजूंनी एक विहिर अणि उपविहिर असं बांधकाम आहे, शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.उपविहीरीच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या नितळ पाण्यात आजही दिसतात.

अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. यातील दक्षिणेकडील २ वाघांच्या पायात दोन-दोन असे चार हत्ती आहेत तर उत्तरेकडील २ वाघ आकाशात झेप घेत आहेत.
याचा थोडक्यात अर्थ असा की (महाराजांनी) दक्षिणदिग्विजय झाला आहे आहे आता उत्तरदिशेकडे झेप घेणार.


Bara Mota Chi Vihir - Sub Well (उपविहीर) - Sept 2014, Rohit Pawar



विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास दोन बाजूने वाटा आहेत.या विहिरीवर पंधरा मोटा बासवन्याची सोय असून प्रत्यकक्षात बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उप विहीर.या दोन्ही विहिरींना जोडणारी  इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी दोन खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले आहेत.महालात लाकडी दरवाजे, पदडे लावण्यासाठी लोखंडी रिंगा आजही अस्तित्वात आहेत.

  विहिरीवर १५ मोटांची जागा असली तरी प्रत्यक्षात १२ मोटांतूनच पाणी उपसा होत असे. इतर ३ मोटा दुरुस्ती काळात पर्यायी मोटा म्हणून वापरत .विहिरीसाठी दगड आणावे लागले होते. हे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला होता त्याचे चाक आजही येथे पाहायला मिळते. या विहीरीच्या समोर मोडी लिपितील शिलालेखही आहे.


Bara Mota Chi Vihir - Entrance & Door (Sept 2014) - Rohit Pawar



या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. स्वत: थोरले शाहू महाराज तिथे बसायचे.


Bara Mota Chi Vihir - All In One Structure ( Sept 2014) - Rahul Bulbule

  •  पोहण्याची मजा
विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.




  •  कसे जाल :
सातारा जिल्हा - तालुका सातारा - लिंब गाव - शेरी विभाग



            पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण  साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.

  • देखभाल                                                       

            रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि  रोहित पवार.

जय जिजाऊ
जय शिवराय

Ads Inside Post